Thank God बाप्पा आपल्या सारखा नसतो...
श्रीगणेश आगमनाच्या मिरवणुकीत "तुझ्या रुपाचं चांदणं पडलंय....." हे गाणं ऐकलं अन क्षणभर विचार आला की खरंच हि गणेशाची मिरवणूक आहे का???? पुढच्या चौकात तर कहरच झाला " Email काल internet वर केला...." ची बंदिश लागली होती (बंदीशच म्हणावी लागेल अशी ही लावणी) नंतर एका ठिकाणी पाहिलं तर श्रीगणेशासमोरच काही जणांनी पत्त्यांचा आखाडा टाकला होता...मला मान्य आहे की गणेशोत्सव हि संकल्पना लोकांना एकत्र आणण्यासाठी सुरु झाली. आता ती सुरुवात भाऊ रंगारी नी कि टिळकांनी सुरु केली त्या वादात नाही पडायचं त्याच्या मागचा उद्देश चांगला होता हे महत्त्वाचं. पण आजकाल गणेशोत्सवाच्या नावाखाली आम्ही पत्त्यांचे फडचं जर भरवत असू तर त्या संकल्पनेला काहीच अर्थ राहणार नाही.. काळानुसार गणेशोत्सवाचे रूप बदलत गेलं... अनेक मंडळांच्या स्थापनेमुळे गणेशोत्सवाकडे उत्सव नाही तर जणू काही स्पर्धा म्हणूनच पाहिलं जाऊ लागलंय.. मग त्या स्पर्धा श्रीगणेशाच्या मूर्तीच्या उंचीवरून ( अमुक मंडळाचा इतका फूट तर तमुक मंडळाचा इतका फूट ) तर कधी मंडळाच्या गणेशाच्या दर्शनाला होणाऱ्या गर्दीवरून... सेलेब्रेटीज पा...