दिवाळी पूर्वीची आणि आताची….
दिवाळी सण दिपोत्सवाचा….आनंदाचा… दिवाळी जस जशी जवळ येवू लागली की वेध लागतात ते घराच्याअंगणात “किल्ला” करायची. दिवाळीत किल्ला करायची प्रथा खूप जूनी परंतू या प्रथेचा निश्चीत इतिहास सांगता येत नाही. आपल्या पूवर्जाच्या पासून दिवाळीत किल्ला करायचा वसा आपण संभाळत आलो, यापुढे आपली भावी पिढी संभाळेल ह्या बाबत प्रश्न चिन्ह माझ्या मनात उपस्तिथ झालंय… दगड, धोँडे, विठा, डबे, गोणपाठ व माती अश्या तत्सम साहित्य वापरुन किल्ला करताना किँवा गडकोठ उभा करताना तो एखाद्या गडदुर्गाँ सारखा हूबेहूब व्हावा असा पण अठ्ठहास नसतो, मात्र तो किल्ला उभा करण्या पाठीमागची भावना मात्र तिच जी शिवप्रभूंच्या स्थापत्य विशारद श्री हिरोजी इंदूलकरांची होती. आंगणात उभा केला जाणारा तो दुर्ग किती फार फार तर स्वतःच्या उंची एवढा, पण त्यामागची प्रेरणा मात्र तोरण्या एवढी. आपल्या गडाची बेलाग बूंलदता केवढी तर श्री राजगडा येवढी. गडाची भव्यता किती तर शिवतिर्थ रायगडा एवढी. अन गडाची श्रीमंती म्हणाल तर शिवनेरी एवढी. आपल्या गडाच्या एका उंच ठिकाणी छत्रपतीचेँ सिँहासन अन त्यात आरुढ झालेले आपले क्षत्रीयकूलावतंस, सिँहासणाधिश्वर, र...