दिवाळी पूर्वीची आणि आताची….
दिवाळी सण दिपोत्सवाचा….आनंदाचा…
दिवाळी जस जशी जवळ येवू लागली की वेध लागतात ते घराच्याअंगणात “किल्ला” करायची. दिवाळीत किल्ला करायची प्रथा खूप जूनी परंतू या प्रथेचा निश्चीत इतिहास सांगता येत नाही. आपल्या पूवर्जाच्या पासून दिवाळीत किल्ला करायचा वसा आपण संभाळत आलो, यापुढे आपली भावी पिढी संभाळेल ह्या बाबत प्रश्न चिन्ह माझ्या मनात उपस्तिथ झालंय…
दगड, धोँडे, विठा, डबे, गोणपाठ व माती अश्या तत्सम साहित्य वापरुन किल्ला करताना किँवा गडकोठ उभा करताना तो एखाद्या गडदुर्गाँ सारखा हूबेहूब व्हावा असा पण अठ्ठहास नसतो, मात्र तो किल्ला उभा करण्या पाठीमागची भावना मात्र तिच जी शिवप्रभूंच्या स्थापत्य विशारद श्री हिरोजी इंदूलकरांची होती.
आंगणात उभा केला जाणारा तो दुर्ग किती फार फार तर स्वतःच्या उंची एवढा, पण त्यामागची प्रेरणा मात्र तोरण्या एवढी.
आपल्या गडाची बेलाग बूंलदता केवढी तर श्री राजगडा येवढी.
गडाची भव्यता किती तर शिवतिर्थ रायगडा एवढी.
अन गडाची श्रीमंती म्हणाल तर शिवनेरी एवढी.
आपल्या गडाच्या एका उंच ठिकाणी छत्रपतीचेँ सिँहासन अन त्यात आरुढ झालेले
आपले क्षत्रीयकूलावतंस, सिँहासणाधिश्वर, राजाधीराज महाराज छत्रपती श्री शिवराय…
पाठीमागे बूरजांवर दोन धिप्पाड मावळे. तसेच गडाच्या तटावर उभे असलेले तलवारी पाजळत धारकरी व यांच्या बरोबर तोफेसह उभे गोलंदाज…
गडाच्या प्रवेशदारावर उभे असलेले राकट दिसणारे द्वारपाल, त्याच्यावर
नगारखान्यात चौघडे शिँगे वाजवणारे मानकरी,
मग गडाच्या पायर्या चढून वर येणारा एखादा हेर, गडावर राजांना भेटायला येणारे गावकरी, शेतकरी.
गडाच्या माची वरील मंदिर व त्यामंदिरा समोर ग्रंथ वाचत बसलेला ब्राह्मण.
गडावर मग आपोआप यंत्रशाळा, अश्वशाळा, गजशाळा, दारुकोठार, धान्यकोठार, शस्रागार, विहीर व गडाच्या चोरवाठा उभ्या राहतात.
गडाच्या पायथ्याला वसवलेली छोठी गावे, गावात भरलेला बाजार, दूकांने गावाच्या बाहेर बहरलेली शेती. शेतीत कष्ठ करणारे शेतकरी जोडपे.
झुळूझुळू वाहणारी नदी व त्यात नांगरलेली होडी, युध्दनौका.
गडाचा अवघड कडा चढणारी हिरकणीमाता,
दूसर्या एखाद्या कड्यावर यशवंती घोरपड…
गडाच्या घेर्यात हळीव, मेथी, मोहरी ठाकून दाठ उगवलेले जंगल, त्यात जंगली प्राणी.
हे दुर्ग म्हणजे मंत्रमुग्ध करणारी कल्पकता, अन उदात्त परंपराची प्रथा.
यामागे या धारकर्याची एकच परमपवित्र भावना असते ती म्हणजे “पाच हि पातशाह्या, हबशी, सिद्दी व युरोपीय टोपीकरांना पंजाखाली चिरडून
पारदास्यत्वाच्या साखळदंडेत अडकलेल्या परमपवित्र भारतमातेला सोडवून स्वतंत्र हिन्दूंचे हिन्दवी स्वराज्य उभे करणारे आपले छत्रपती श्री शिवराय, अन त्यांच्याप्रती असलेली आपली निष्ठा यासाठी केलेला हा किल्ला.”
हे सारं पाहताना शिवप्रभूंचे डोळे आकाशात पाणावले नसतील तर नवल.!
आणि
एक वाक्य त्या गडकर्याच्या मनात नेहमी गुंजत राहिल,-
परंतु 21 व्या शतकातील आधुनिकतेचा काहीसा बदल हा मनाला न पटणाराच आहे…आज च्या लहान मुलां ना पूर्वी सारखं आकर्षण राहिलंय का किल्ले बनवण्यात
काही मुलं त्याला अपवाद असतील हि. परंतु Candy Crush Game च्या 500 level सहजपणे पार करणारी आजची पिढी रायगडच्या महादरवाजा गाठण्यापूर्वीच थकताना दिसते…
इयत्ता ४थी मध्ये इतिहास शिकवला जातो पण तोच इतिहास फक्त परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी मर्यादित न ठेवता आजच्या जीवनशैली मध्ये कसा आत्मसात करायचा हेच मुळी शिकवलं जात नाही.
नशीबवान आहे महाराष्ट्र ज्याला शिवरायांचा इतिहास आणि त्या अजरामर इतिहासाची साक्ष देणारे किल्ले 350 वर्षानंतर देखील तग धरून आहेत नाहीतर आजकाल शासनाने बांधलेले 5 वर्षांपूर्वी चे रस्ते, पूल, व्यवस्थीत नाहीत…
येणाऱ्या पिढीला जर शिवरायांच्या इतिहासाचा वारसा जर द्यायचा असेल तर किल्ले रुपी संपत्तीचं जतन आणि संवर्धन करणं तितकंच महत्वाचं आहे नाहीतर येणारी पिढी किल्ला काय असतो हे फक्त फोटो मध्ये पाहत राहील…
शब्दांकन: ऋषिकेश सुदर्शन शिंदे.

“उभाच राहिन मी सांगेनगाथा तुझ्या पराक्रमाची,आठवण सदा करून देईनहिन्दूंच्या इतिहासाची”

Comments
Post a Comment