अटलजी : भारतीय राजकारणाचा सूर्य
टूटे हुए सपनों की सुने कौन सिसकी ? अंतर को चीर व्यथा पलकों पर ठिठकी। हार नहीं मानूँगा, रार नयी ठानूँगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ। गीत नया गाता हूँ। आदरणीय अटल बिहारी वाजपेयींच्या निधनाची बातमी नक्कीच प्रत्येक भारतीयांच्या मनाला चटका लावणारी होती..एक पत्रकार, एक कवी, आणि एक सच्चा राजकारणी ज्यांनी कधीही सत्तेसाठी राजकीय तडजोडी केल्या नाहीत. कवी मनाच्या अटलजींनी त्यांच्या कविता मधून त्यांची सामाजिक आणि राजकीय भूमिका नेहमीच स्पष्ट केली.. राजकीय सत्ता कोणाचीही असो देशहित महत्वाच मानणारे अटलजी लिहतात सत्ता का खेल तो चलता रहेगा... पार्टियां आएंगी जाएंगी... सरकारे बनेगी बिगडेगी... मगर ये देश रहना चाहिये... इस देश का लोकतंत्र रहना चाहिये... एक राजकारणी देशहितासाठी सत्तेपासून अलिप्त राहण्याची तयारी दाखवतो हे " न भूतो न भविष्यती " असं व्यक्तिमत्व म्हणजे अटलजी... "अगर पार्टी तोड़कर सत्ता हाथ मैं आती हैं, तो उस सत्ता को मैं चिमटे से भी नही छुउंगा!!" भविष्यात अटलजींची आठवण प्रत्येक देशहित कार्यात येणार...