अटलजी : भारतीय राजकारणाचा सूर्य
टूटे हुए सपनों की सुने कौन सिसकी ?
अंतर को चीर व्यथा पलकों पर ठिठकी।
हार नहीं मानूँगा,
रार नयी ठानूँगा,
काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ।
गीत नया गाता हूँ।
आदरणीय अटल बिहारी वाजपेयींच्या निधनाची बातमी नक्कीच प्रत्येक भारतीयांच्या मनाला चटका लावणारी होती..एक पत्रकार, एक कवी, आणि एक सच्चा राजकारणी ज्यांनी कधीही सत्तेसाठी राजकीय तडजोडी केल्या नाहीत.
कवी मनाच्या अटलजींनी त्यांच्या कविता मधून त्यांची सामाजिक आणि राजकीय भूमिका नेहमीच स्पष्ट केली..
राजकीय सत्ता कोणाचीही असो देशहित महत्वाच मानणारे अटलजी लिहतात
सत्ता का खेल तो चलता रहेगा...
पार्टियां आएंगी जाएंगी...
सरकारे बनेगी बिगडेगी...
इस देश का लोकतंत्र रहना चाहिये...
एक राजकारणी देशहितासाठी सत्तेपासून अलिप्त राहण्याची तयारी दाखवतो हे " न भूतो न भविष्यती " असं व्यक्तिमत्व म्हणजे अटलजी...
"अगर पार्टी तोड़कर सत्ता हाथ मैं आती हैं,
तो उस सत्ता को मैं चिमटे से भी नही छुउंगा!!"
तो उस सत्ता को मैं चिमटे से भी नही छुउंगा!!"
भविष्यात अटलजींची आठवण प्रत्येक देशहित कार्यात येणार हे नक्की
जेव्हा देशात अणुशक्ती बद्दल बोललं जाईल,
जेव्हा सत्यवादी राजकारणाबद्दल बोललं जाईल,
जेव्हा देशहितासाठी सत्तेला सोडण्या बद्दल बोललं जाईल,
जेव्हा देशशत्रूला प्रत्युत्तर देण्याबद्दल बोललं जाईल,
जेव्हा देशात अणुशक्ती बद्दल बोललं जाईल,
जेव्हा सत्यवादी राजकारणाबद्दल बोललं जाईल,
जेव्हा देशहितासाठी सत्तेला सोडण्या बद्दल बोललं जाईल,
जेव्हा देशशत्रूला प्रत्युत्तर देण्याबद्दल बोललं जाईल,
आणखी बऱ्याच गोष्टीत अटलजींची आठवण येत राहील.
अटलजींचं जीवन अजरामर राहील सदोदित देशहिताचा विचार करणाऱ्या अटलजींनी स्वतःच्या जीवाची देखील कधी पर्वा केली नाही.
जन्म-मरण अविरत फेरा
आज यहाँ, कल कहाँ कूच है
अंधियारा आकाश असीमित,
प्राणों के पंखों को तौलें।
राजकीयविरोधी पक्षा बद्दल कधीही इर्षा त्यांनी ठेवली नाही . 3 वेळा अटलजी पंतप्रधान झाले परंतु प्रत्येक वेळी त्यांना अनेक संकटांना समोर जावं लागलं मग ते पाकिस्तान बरोबर मैत्री करण्यापासून त्याच पाकिस्तान बरोबर युद्ध असो अथवा विमानात ओलीस ठेवण्यात आलेल्या भारतीयाबदली अतिरेक्यांना सोडणं असो किंवा संसदेवर झालेला हल्ला असो. या सर्व वाईट प्रसंगातून बाहेर पडत देशाला अणुशक्ती प्रदान करण्यात अटलजी नक्कीच यशस्वी झाले...
प्रत्येक संकटाशी न डगमगता लढलेले,
सत्तेचा मोह न बाळगता हसत-हसत राजीनामा देण्याचं धारिष्ट्य दाखवलेले आणि एक-दोन नव्हे तर तब्बल 22 पक्षांसोबत 'कदम मिलाकर' सरकार चालवलेले देशाचे माजी पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयी यांचं आज निधन झालं आहे.
त्यांच्या जाण्यानं देशाच्या राजकीय इतिहासातील 'अटल' अध्यायाची सांगता...!

अटलजींच्या जाण्याने एक अमूल्य भारत रत्न निखळलं आणि भारतीय राजकारणाचा सूर्य मावळला..
मौत से ठन गई!
जूझने का मेरा इरादा न था,
मोड़ पर मिलेंगे इसका वादा न था,
यों लगा ज़िन्दगी से बड़ी हो गई।
ज़िन्दगी सिलसिला, आज कल की नहीं।
कवी मनाच्या राजकीय भीष्म पितामहाबद्दल लिहण्यास आज माझी लेखणी देखील धजावत नाही..निशब्द....
अटलजींना भावपूर्ण श्रद्धांजली..
✍️ऋषिकेश सुदर्शन शिंदे
✍️ऋषिकेश सुदर्शन शिंदे
Comments
Post a Comment