Posts

अटलजी : भारतीय राजकारणाचा सूर्य

Image
टूटे हुए सपनों की सुने कौन सिसकी ? अंतर को चीर व्यथा पलकों पर ठिठकी। हार नहीं मानूँगा, रार नयी ठानूँगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ। गीत नया गाता हूँ। आदरणीय अटल बिहारी वाजपेयींच्या निधनाची बातमी नक्कीच प्रत्येक भारतीयांच्या मनाला चटका लावणारी होती..एक पत्रकार, एक कवी, आणि एक सच्चा राजकारणी ज्यांनी कधीही सत्तेसाठी राजकीय तडजोडी केल्या नाहीत.  कवी मनाच्या अटलजींनी त्यांच्या कविता मधून त्यांची सामाजिक आणि राजकीय भूमिका नेहमीच स्पष्ट केली.. राजकीय सत्ता कोणाचीही असो देशहित महत्वाच मानणारे अटलजी लिहतात सत्ता का खेल तो चलता रहेगा... पार्टियां आएंगी जाएंगी... सरकारे बनेगी बिगडेगी... मगर ये देश रहना चाहिये... इस देश का लोकतंत्र रहना चाहिये... एक राजकारणी  देशहितासाठी सत्तेपासून अलिप्त  राहण्याची तयारी दाखवतो हे  " न भूतो न भविष्यती " असं व्यक्तिमत्व म्हणजे अटलजी... "अगर पार्टी तोड़कर सत्ता हाथ मैं आती हैं, तो उस सत्ता को मैं चिमटे से भी नही छुउंगा!!" भविष्यात अटलजींची आठवण प्रत्येक देशहित कार्यात येणार...

दिवाळी पूर्वीची आणि आताची….

Image
दिवाळी सण दिपोत्सवाचा….आनंदाचा… दिवाळी जस जशी जवळ येवू लागली की वेध लागतात ते घराच्याअंगणात “किल्ला” करायची. दिवाळीत किल्ला करायची प्रथा खूप जूनी परंतू या प्रथेचा निश्चीत इतिहास सांगता येत नाही. आपल्या पूवर्जाच्या पासून दिवाळीत किल्ला करायचा वसा आपण संभाळत आलो, यापुढे आपली भावी पिढी संभाळेल ह्या बाबत प्रश्न चिन्ह माझ्या मनात उपस्तिथ झालंय… दगड, धोँडे, विठा, डबे, गोणपाठ व माती अश्या तत्सम साहित्य वापरुन किल्ला करताना किँवा गडकोठ उभा करताना तो एखाद्या गडदुर्गाँ सारखा हूबेहूब व्हावा असा पण अठ्ठहास नसतो, मात्र तो किल्ला उभा करण्या पाठीमागची भावना मात्र तिच जी शिवप्रभूंच्या स्थापत्य विशारद श्री हिरोजी इंदूलकरांची होती. आंगणात उभा केला जाणारा तो दुर्ग किती फार फार तर स्वतःच्या उंची एवढा, पण त्यामागची प्रेरणा मात्र तोरण्या एवढी. आपल्या गडाची बेलाग बूंलदता केवढी तर श्री राजगडा येवढी. गडाची भव्यता किती तर शिवतिर्थ रायगडा एवढी. अन गडाची श्रीमंती म्हणाल तर शिवनेरी एवढी. आपल्या गडाच्या एका उंच ठिकाणी छत्रपतीचेँ सिँहासन अन त्यात आरुढ झालेले आपले क्षत्रीयकूलावतंस, सिँहासणाधिश्वर, र...

Thank God बाप्पा आपल्या सारखा नसतो...

Image
श्रीगणेश आगमनाच्या मिरवणुकीत "तुझ्या रुपाचं चांदणं पडलंय....." हे गाणं ऐकलं अन क्षणभर विचार आला की खरंच हि गणेशाची मिरवणूक आहे का???? पुढच्या चौकात तर कहरच झाला " Email काल internet वर केला...." ची बंदिश लागली होती (बंदीशच म्हणावी लागेल अशी ही लावणी) नंतर एका ठिकाणी पाहिलं तर श्रीगणेशासमोरच काही जणांनी पत्त्यांचा आखाडा टाकला होता...मला मान्य आहे की गणेशोत्सव हि संकल्पना लोकांना एकत्र आणण्यासाठी सुरु झाली. आता ती सुरुवात  भाऊ रंगारी नी कि टिळकांनी सुरु केली त्या वादात नाही पडायचं त्याच्या मागचा उद्देश चांगला होता हे महत्त्वाचं. पण आजकाल गणेशोत्सवाच्या नावाखाली आम्ही पत्त्यांचे फडचं जर भरवत असू तर त्या संकल्पनेला काहीच अर्थ राहणार नाही.. काळानुसार गणेशोत्सवाचे रूप बदलत गेलं... अनेक मंडळांच्या स्थापनेमुळे गणेशोत्सवाकडे उत्सव नाही तर  जणू काही स्पर्धा म्हणूनच पाहिलं जाऊ लागलंय.. मग त्या स्पर्धा श्रीगणेशाच्या मूर्तीच्या उंचीवरून ( अमुक मंडळाचा इतका फूट तर तमुक मंडळाचा इतका फूट ) तर कधी मंडळाच्या गणेशाच्या दर्शनाला होणाऱ्या गर्दीवरून... सेलेब्रेटीज पा...